Fire In Karvenagar

पुण्यातील कर्वेनगर परिसरात मोठी आग,अग्नीशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

1103 0

पुणे : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील दुधाने लॉन्सजवळील (Dudhane lawns in Karve Nagar Pune) गॅरेजला मोठी आग लागली आहे (Fire In Garage Karve Nagar). धुराचे लोळ हवेत मोठया प्रमाणात पसरत आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 4 गाडया आणि 2 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दुधाने लॉन्स जवळील गॅरेजला आग लागली आहे. धुराचे लोळ हवेत मोठया प्रमाणात पसरत आहेत. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून हि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्ये भीषण आग
पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्येदेखील अशाच प्रकारची आग लागली होती. या आयटी पार्कमध्ये 300 कर्मचारी अडकले होते. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!