Murder

दौंड हादरलं! तृतीयपंथीयाची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या

951 0

दौंड : वरवंड या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका तृतीयपंथीयाचा राहत्या घरात गळा चिरून निघृणपणे खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत या प्रकरणी एकाला अटक केली आहे. सचिन ऊर्फ सोनूदीदी दिनेश जाधव (वय 40, मूळ, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. वरवंड) (Sachin Dinesh Jadhav) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत ऊर्फ चंदर शिवाजी जाधव (वय 30, रा. वरवंड) (Chander Shivaji Jadhav) या संशयित आरोपीला अटक केली आहे. 6 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत खोली मालक बापू खोमणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी बापू खोमणे यांच्या एका खोलीत तृतीयपंथी राहत होता. गुरुवारी सकाळी काही जणांना खोलीतून दुर्गंधी आल्याने सगळ्यांना संशय आला.

यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी रेखा वाणी, संजय नागरगोजे, विजय कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवून चंद्रकांत ऊर्फ चंदर शिवाजी जाधव याला ताब्यात घेतले आहे. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!