sriganeshan

भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचं निधन, मंचावरच सोडला प्राण

1445 0

मुंबई : भरतनाट्यमचे लोकप्रिय गुरू आणि वादक श्री गणेशन (Sri Ganesan) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करत असताना ते अचानक मंचावर कोसळले. यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 60 वर्षांचे होते.

श्री गणेशन हे मलेशियातील (Malaysia) कुआलालंपुर येथील श्री गणेशालयाचे संचालक होते.भुवनेश्वर येथील कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार होते. गीत गोविंदावर आधारित भरतनाट्यम सादर करत असताना ते मंचावर कोसळले. श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे असून ते भरतनाट्य सादरीकरणासाठी भारतात आले होते. त्यांचे हार्ट अटॅकने (Heart Attack) निधन झाले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!