Shark Attack

समुद्रात पोहताना व्यक्तीवर अचानक शार्कने केला हल्ला; मृत्यूचा Live Video आला समोर

702 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इजिप्तमधून (Egypt) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये इजिप्तमधील हर्गहाडा येथील रेड सी रिसॉर्टमध्ये (Red Sea Resort) शार्कने केलेल्या हल्ल्यात (Shark Attack) एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात मृत पावलेला व्यक्ती हा रशियाचा नागरिक होता. या व्यक्तीवर टायगर शार्कने अचानक हल्ला केला. रशियन व्यक्तीने बरात वेळ शार्कचा हल्ला टाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण तो सुटू शकला नाही.

या भयानक दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एक व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. पण टायगर शार्क पुन्हा पुन्हा त्याच्याभोवती फिरू लागतो आणि संधी मिळताच त्याच्यावर हल्ला करतो. शार्कने अनेकवेळा त्या व्यक्तीला पाण्याखाली ओढण्याचा प्रयत्न केला.

या घटनेदरम्यान एका लाइफगार्डने आरडाओरडा करून अनुचित घटनेचा इशारा दिला होता, त्यानंतर काही लोक त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले. मात्र,मदत मिळण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या टायगर शार्कला पकडण्यात आले असून या हल्ल्यामागे नेमकं कारण काय होतं, याचा शोध सुरु असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्या व्यक्तीचे वडीलही किनाऱ्यावर उपस्थित होते. हे भयानक दृश्य वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मात्र तेदेखील काही करू शकले नाहीत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide