पुण्यात अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; घरात सापडली तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम

1180 0

पुणे : पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयचा छापा पडला आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका IAS अधिकाऱ्यावर अशी कारवाई करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराची जमिन माळशिरस येथे आहे. त्यांची जमीन महामार्गालगत आहे. शासनाचे त्याचे भू-संपादन केलेले आहे. त्याचा मोबदला लवकर देण्यासाठी डॉ. अनिल रामोड यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार दिली होती.

शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी डॉ. अनिल रामोड यांनी 8 लाख रूपयाची लाच घेतली. त्यानंतर डॉ. रामोड यांना सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतलं. त्यांना चौकशीसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नेले दरम्यान, डॉ. रामोड यांच्या औंध-बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटीतील बंगल्यावर आणि नांदेड येथील घरावर सीबीआयच्या पथकाने छापेमारी सुरू केली.

Share This News
error: Content is protected !!