BJP

पुणे जिल्ह्यात तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी; ‘या’ तिघांवर दिली महत्वाची जबाबदारी

614 0

पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात लवकरच लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. परंतु भाजपने फक्त या निवडणुकीसाठी नाहीतर पुणे जिल्ह्याच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे.

कोणावर दिली जबाबदारी ?
पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांवर सोपवण्यात आली आहे. हे तिघेही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मानले जातात.

बारामतीवर विशेष लक्ष
बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या लोकसभा मतदार संघावर 1991 पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!