Scan UPI

आता कार्ड न वापरता एटीएममधून काढता येतील पैसे, ‘या’ बँकेनं सुरू केली सुविधा

786 0

काय सांगता डेबिट कार्ड (Debit Card) घरी विसरलात आणि ATM मधून पैसे काढायचे आहे.मात्र आता चिंता करू नका.कारण ATM मधून पैसे काढायला आता डेबिट कार्डची गरज भासणार नाही ‘यूपीआय’च्या (UPI) माध्यमातूनही आता पैसे काढता येतील. कसे ते जाणून घेऊयात….

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या सरकारी बँकेने ‘इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल’ (Interoperable Cardless Cash Withdrawal) म्हणजेच आयसीसीडब्ल्यू सुविधा उपलब्ध करून दिली आहे.आयसीसीडब्ल्यू’ सुविधा देणारी ही देशातील पहिली सरकारी बँक आहे. नव्या सुविधेमुळं ग्राहकांना पैसे काढण्यासाठी सहज आणि सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर ग्राहकांना सुरक्षेच्या दृष्टीनंही लाभ होणार आहे. डेबिट कार्डशी संबंधित क्लाेनिंग, स्किमिंग तसेच उपकरणाशी छेडछाडीद्वारे ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे.

आता या ATM मधून पैसे कसे काढता येतील याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया….
1) सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर ‘यूपीआय कॅश विड्रॉल’ पर्याय निवडा. यानतंर तुम्हाला किती रक्कम पाहिजे ती टाका. यानंतर एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड येईल.
2)‘आयसीसीडब्ल्यू’साठीच्या अधिकृत यूपीआय ॲपद्वारे हा कोड स्कॅन करा. व्यवहार अधिकृत करताच पैसे एटीएममधून बाहेर येतील.
3) यावेळी तुम्हाला एकावेळी 5 हजार रुपयेच काढता येतील. एका यूपीआय आयडीशी अनेक बँक खाती जुळली असल्यास ग्राहकांना त्यापैकी एक खाते निवडण्याचा पर्यायदेखील यावेळी मिळणार आहे.

आयसीसीडब्ल्यू सुविधेद्वारे भीम यूपीआय आणि अन्य यूपीआय ॲप्लिकेशनचा वापर करणारे इतर बँकांचे ग्राहकही एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक एका दिवसात दाेन वेळा पैसे काढू शकतील मात्र त्यांना एकावेळी 5 हजार रुपयेच काढता येणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!