JOBS

EMRS Recruitment 2023: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘एवढ्या’ जागांसाठी होत आहे भरती; ‘या’ प्रकारे करा अर्ज

953 0

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये (Eklavya Model Residential School) मोठ्या प्रमाणात भरती (Recruitment) काढली आहे. एकूण 38480 जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये अध्यापन आणि शिक्षकेतर पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे जे तरुण सरकारी नोकरी (Job) शोधत आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. या पदासाठीची नोंदणी अद्याप सुरू झाली नाही. मात्र इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे या पदासाठी अर्ज करू शकतात. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कशाप्रकारे होणार निवड?
या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. प्रथम तीन तासांची लेखी परीक्षा होईल. यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.

कधी करणार अर्ज ?
सध्या ऑनलाईन अर्जाची लिंक ओपन झालेली नाही. त्यामुळे अर्ज कधी सुरू होतील आणि शेवटची तारीख काय आहे? अशा माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा. येथून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. अर्ज करण्यासाठी आणि तपशील जाणून घेण्यासाठी, NTA च्या अधिकृत वेबसाईटला recruitment.nta.nic.in. भेट द्या.

कोणत्या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत?
प्राचार्य – 740 पदे

उपप्राचार्य – 740 पदे

पदव्युत्तर शिक्षक – 8140 पदे

पदव्युत्तर शिक्षक (Computer Science) – 740 पदे

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 8880 पदे

कला शिक्षक – 740 पदे

संगीत शिक्षक – 740 पदे

शारीरिक शिक्षण शिक्षक – 1480 पदे

ग्रंथपाल – 740 पदे

स्टाफ नर्स – 740 पदे

वसतिगृह वॉर्डन – 1480 पदे

लेखापाल – 740 पदे

खानपान सहाय्यक – 740 पदे

चौकीदार – 1480 पदे

कुक – 740 पोस्ट

समुपदेशक – 740 पदे

चालक – 740 पदे

इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – 740 पदे

गार्डनर – 740 पदे

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 1440 पदे

लॅब अटेंडंट – 740 पदे

मेस हेल्पर – 1480 पदे

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 740 पदे

सफाई कामगार – 2220 पदे

कशाप्रकारे कराल अर्ज ?
1) सर्वप्रथम एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल भर्ती 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि उपलब्ध पदांशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील समजून घेण्यासाठी अधिसूचना नीट वाचा.
3) यानंतर तुम्ही नवीन अर्जदार असल्यास आवश्यक माहिती देऊन वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणीकृत असल्यास तुमचे क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
4) यानंतर अर्ज फॉर्ममध्ये जा आणि सूचनांनुसार वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर कोणत्याही संबंधित माहिती काळजीपूर्वक भरा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज भरल्यानंतर तो सबमिट करण्यापूर्वी दोनवेळा नक्की वाचा.
5) यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. आवश्यकतांनुसार. कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करून घ्या.
6) अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे आवश्यक अर्ज फी भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. फी भरल्यानंतर जनरेट झालेली पावती डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!