Jee Karda

मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट सांगणारा ‘जी करदा’ चा ट्रेलर रिलीज

476 0

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हीने तिच्या स्टाईलने आणि अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. नुकताच तमन्ना भाटियाच्या ‘जी कारदा’ (Jee Karda) या वेब सीरिज ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सात मित्रांची कथा आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15 जून रोजी रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये रोमान्स आणि मैत्रीसोबतच आयुष्यातील समस्याही दाखवण्यात आल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CtGVDp6IADE/?utm_source=ig_embed&ig_rid=464cc6fd-0ed2-4335-a1c2-431bd585ecad

‘जी कारदा’ या सिरीजमध्ये तमन्ना भाटियाच्या व्यतिरिक्त आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल आणि सायन बॅनर्जी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा (Arunima Sharma) यांनी केले आहे. ‘जी कारदा’ वेब सीरिजचे 8 एपिसोड्स असणार आहेत. ‘जी कारदा’ या तमन्ना भाटियाच्या वेब सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तमन्ना भाटियाने नुकताच सोशल मीडियावर ‘जी कारदा’ या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे.

तमन्नाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाचा बबली बाउंसर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच तिचा प्लॅन ए प्लॅन बी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्नासोबत रितेश देशमुख याने देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

Share This News
error: Content is protected !!