Shakuni Mama

महाभारतातील शकुनी मामा म्हणजेच गूफी पेंटल यांचे निधन

762 0

मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल (Goofy Pentle) यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती नाजूक होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

टेलिव्हिजनवरील महाभारत ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय झाले.आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे शकुनी मामा. हे पात्र अभिनेता गुफी पेंटल यांनी साकारले होते. गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू (Pass Away) झाला. ते 78 वर्षांचे होते. गुफी पेंटल यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गुफी पेंटल यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमधून केली होती, मात्र त्यांना खरी ओळख ‘महाभारत’मधील शकुनी मामाच्या भूमिकेतून मिळाली. गुफी पेंटलने 80 च्या दशकात अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. गुफी पेंटल यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!