Australian-team

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

775 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 7 जूनपासून डब्ल्यूटीसीचा फायनल (WTC Final) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी संघातून बाहेर पडला आहे. जोश हेजलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज मायकल नासेरला (Michael Nasser) संघात स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीने दिली माहिती
जोस हेझलवूडला संघातून वगळल्याची घोषणा आयसीसीकडून (ICC) करण्यात आली आहे. जोश हेझलवूड गेल्या काही काळापासून त्याच्या दुखापतीशी झुंजत आहे. यामुळे त्याला यावेळी महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाबाहेर जावे लागले आहे. टीम ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide