shruti jadhav

लातूरच्या सृष्टी जगतापने सलग 126 तास नृत्य सादर करत रचला जागतिक विक्रम

683 0

लातूर : लातूरच्या (Latur) सोळा वर्षांच्या सृष्टी जगतापने (Srushti Jagtap) आज जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. सलग 126 तासापेक्षा अधिक नृत्य करत तिने इतिहास रचला आहे. तिच्या या विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness Book of World Records) घेतली आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात (Dayanand Auditorium) 29 तारखे पासून सृष्टी जगतापने नृत्य करण्यास सुरुवात केली होती. पाच दिवस पाच रात्र तिने सलग नृत्य केले आहे.

सृष्टीने यापूर्वीही 24 तास सलग नृत्य करत आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Asia Book of Records) स्वत:च्या नावाची नोंद केली होती. यातूनच प्रेरणा घेत तिने जागतिक विक्रम करण्याचे ठरवले. या विक्रमासाठी तिने मागील काही वर्षांपासून तयारी सुरू केली होती. सृष्टी जगतापचा विक्रम पूर्ण होत असताना लातूरकरांनी दयानंद सभागृहात मोठी गर्दी केली होती. यावेळी सभागृहात महिला आणि तरुण मुलीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सगळ्यात मोठा नृत्य मॅरेथॉन
सृष्टीच्या अगोदर हा विक्रम केरळ येथील हेमलता यांच्या नावावर होता. तो 123 तासाचा होता. त्यानंतर नेपाळ मधील बंदना नावाच्या मुलीने 2018 मध्ये 123 तासापेक्षा काही अधिक काळ नृत्य करत हा विक्रम मोडला होता. यानंतर आता सृष्टीने तब्बल 126 तास सलग नृत्य करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Share This News
error: Content is protected !!