तेलंगणात हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू, नलगोंडा जिल्ह्यात भीषण दुर्घटना

554 0

नलगोंडा- तेलंगणात प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. ही घटना तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात कृष्णा नदीवरील नागार्जुनसागर धरणाच्या जवळ पेद्दावुरा ब्लॉकमधील तुंगतुर्थी गावात घडली.

मृत्यू झालेल्या वैमानिकांपैकी एक महिला प्रशिक्षणार्थी होती अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सकाळच्या वेळी एकदम मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. शेतकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा एक हेलिकॉप्टर कोसळलेले दिसले. हेलिकॉप्टरमधून धूर निघत होता. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. नलगोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Share This News
error: Content is protected !!