Khandve

पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना न्यायाधीशांना धमकावल्या प्रकरणी अटक

761 0

गडचिरोली : आपल्या विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे त्यांची चंद्रपूरच्या (Chandrapur) कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान 20 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी अतुल गण्यार पवार (Atul Ganyar Pawar) यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी चामोर्शीत आंदोलन करण्यात आले. मात्र तरीदेखील पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे अतुल गण्यारपवार न्यायालयात गेले.

चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी 20 मे रोजी कलम 294, 324, 326 नुसार राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा (Crime) नोंदवण्याचे आदेश दिले होते. याचा राग आल्याने राजेश खांडवे याने न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांना धमकावले. या प्रकरणी न्यायाधीश मेश्राम यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवगत करून गडचिरोली (Gadchiroli) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर कारवाई करत अखेर 3 जून रोजी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!