drowning hands

पुण्यात पवना धरणात बुडून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

658 0

पुणे : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पवन मावळातील चावसर गावच्या हद्दीतील पवना धरण (Pavana Dam) पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी धरणात बुडून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण बबन साठे (वय 40, रा. साठेसाई, ता. मुळशी, जि. पुणे) (Laxman Baban Sathe) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
मृत लक्ष्मण साठे हे पवन मावळ परिसरातील चावसर गावात आपल्या बहिणीकडे कामानिमित्त आले होते. यावेळी ते जवळच असलेल्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे साठे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!