Sangli

रुग्णालयात दाखल पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा अपघातात मृत्यू

3007 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रुग्णालयातील पत्नीला पाहून घरी परतत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जत येळवी मार्गावर भुलेश्वर फाट्याच्या पुढे येळवी जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले आहे. दगडू शंकर करंडे आणि सुखदेव खरात अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर बापू धोंडीबा शिंदे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
तिघेही सांगोला तालुक्यातील अभिसेवाडी येथील रहिवासी आहेत. तिघेजण जिवलग मित्र असून, ते मुंबईला कंटेनरवर चालक म्हणून कामास आहेत. तिघेही चार दिवस सुट्टी घेऊन गावी आले होते. यामधील सुखदेव खरात याच्या पत्नीचे जतमधील एका खाजगी रुग्णालयात पिशवीचे ऑपरेशन झाले होते. तिला पाहण्यासाठी हे तिघेही आपल्या ईरटीगा कारने जतला गेले होते.

यादरम्यान रुग्णालयातून घरी परत जात असताना घोलेश्वर फाट्याच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर वनीकरणच्या हद्दीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्या कारने तीन-चार वेळा पलटी खाल्ली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी जत पोलीस ठाण्यात (Jat Police Station) नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!