RSS

मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र व्हायरल केल्याने कर्नाटकात RSS कार्यकर्त्याला अटक

678 0

बंगळुरू : सध्या कर्नाटकातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र (Cartoon) समाज माध्यमांवर शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
यामध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘मुले जन्माला घालणारी फॅक्टरी’असा उल्लेख केला होता. या घटनेमुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेकांनी यावर तीव्र आक्षेप घेत, संबधीतावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या व्यक्तीने हे व्यंगचित्र त्यांच्या व्हॅाटसअ‍ॅप स्टेटसवर शेअर केल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी रायचूर पोलिसांनी (Raichur Police) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. राजू थुंबक (Raju Thumbak) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लिंगासुगुर येथील रहिवाशी आहेत.

Share This News
error: Content is protected !!