Medicine And Milk

दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘ही’ 4 औषधे, अन्यथा जाईल जीव

495 0

आपण आजारी पडलो कि अनेक प्रकारची औषधे घेत असतो. पण कधी कधी त्याचा काहीच परिणाम होत नाही. यामागे अशी काही कारणे असू शकतात, जी तुम्हाला अगदी सामान्य वाटत असली तरी वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहेत. काहीजण ही औषधे (Medicines) पाण्याशिवाय दूध (Milk) किंवा ज्यूससोबत घेतात. काही औषधे दुग्धजन्य पदार्थांसह घेतल्यास त्याचा शरीरावर परिणाम होतो. दुधात भरपूर कॅल्शियम (Calcium) असते. ज्यामुळे औषधाचा प्रभाव कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया जाणून घेऊया दुधासोबत कोणते औषध घेऊ नये.

१) टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्स​ (Tetracycline Antibiotics) 
टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्स हे औषधांचा समूह आहे, जे कधीही दुधासोबत घेऊ नये. या औषधांमध्ये यूटीआय, श्वसनमार्गाचे संक्रमण आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांसाठी औषधे समाविष्ट आहेत. ते बॅक्टेरियाची वाढ थांबवण्याचे काम करतात. त्यामुळे ही औषधे दुधासोबत घेऊ नये.

२) बिस्फोस्फोनेट (हाडांचे औषध) (Bisphosphonate) 
बिस्फोस्फोनेट्स हा औषधांचा एक वर्ग आहे ज्याचा उपयोग हाडांना कमकुवत करणारे रोग जसे की ऑस्टियोपेनिया, ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांचा कर्करोग यांसारख्या परिस्थितींवर उपचार करण्यासाठी केला जातो. तुम्ही हे औषध दुधापासून बनवलेल्या कोणत्याही उत्पादनासोबत घेतल्यास तुमच्या हाडांना तेवढा फायदा होणार नाही. यामुळे हे औषध दुधासोबत घेऊ नये.

३) ​लोह सप्लीमेंट्स (Iron supplements) 
रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुमचे डॉक्टर फेरस सल्फेट आणि फेरस ग्लुकोनेट सारख्या गोळ्या लिहून देऊ शकतात. ती औषधेदेखील दुधासोबत घेऊ नये.

४) ​थायरॉईडचे औषध (Thyroid Medication) 
काही औषधे आहेत जी हायपोथायरॉईडीझमच्या उपचारात मदत करू शकतात, ज्यात लेव्होथायरॉक्सिन (सिंथ्रॉइड, लेव्होक्सिल, लेव्होथ्रॉइड, युनिथ्रॉइड), आर्मर थायरॉइड आणि लिओथायरॉनिन (सायटोमेल) यांचा समावेश आहे. थायरॉईडची सर्व औषधे रिकाम्या पोटी घ्यावीत. परंतु जर तुम्ही ही औषधे दुधासोबत घेतली तर त्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे हे औषध दुधासोबत घेणे टाळावे.

टीप : यामधील कोणतेही उपचार करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!