Gautami And Father

आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

761 0

मुंबई : गौतमी पाटील (Gautami Patil) ही गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या समोरील अडचणी काही थांबायच्या नाव घेईना. तिच्या कार्यक्रमामुळे वाद होताच होते. त्यातच आता तिच्या आडनावावरून एक नवा वाद (Argument over Surname) समोर आला आहे. गौतमीमुळे पाटील या आडनावाची बदनामी होते, त्यामुळे तिने पाटील आडनाव वापरू नये अशी मागणी एका संघटनेकडून करण्यात आली होती. या सगळ्यावर आता गौतमी पाटीलच्या वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गौतमी पाटीलचे वडील?
गौतमी पाटीलचे (Gautami Patil) वडील रवींद्र नेरपगारे पाटील (Ravindra Nerapagare Patil) यांनी एका मुलाखतीमध्ये गौतमीच्या नावाबाबत सांगितले. ते म्हणाले ‘गौतमीचं शाळेतील दाखल्यावरील नाव गौतमी पाटील आहे आणि जन्म नाव वैष्णवी आहे. मी 20 वर्षांपासून गौतमी आणि तिच्या आईपासून वेगळं राहात आहे. काही लोकांचे मत आहे की गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये, याबाबत गौतमीच्या वडिलांना प्रश्न विचारण्यात आला. यावर रवींद्र यांनी उत्तर दिल, ‘जर तिचं आडनाव पाटील आहे तर ती पाटील आडनाव हे लावणारच.’

गौतमी पाटील ही मूळची धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. काही दिवसांपुर्वी गौतमीचा ‘खान्देश कन्या’ (Khandesh Kanya) म्हणून गौरवही करण्यात आला होता. गौतमी पाटील ही अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Share This News
error: Content is protected !!