Breaking News
Aalandi

आळंदीतील भोसले कुटुंबीयांना मिळाला बैलजोडीचा मान

443 0

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 11 जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार असून यावर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा या बैलजोडीला मिळाला आहे.

माऊलींचा पालखीरथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने खास कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली असून आज वाजत-गाजत प्रदक्षिणा मार्गावरून या बैल जोडीची मिरवणूक काढण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या महाद्वारात पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांच्या हस्ते मानकरी भोसले यांना सन्मानित करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!