Gold Silver Rate

Gold Silver Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

2151 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59834 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या भावातदेखील मोठी घसरण झाली आहे. चांदी 71840 रुपये प्रति किलो आहे.

या कारणामुळे सोने झाले स्वस्त
सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण होण्याचे कारण म्हणजे डॉलर मजबूत स्थितीत आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. यावर कमोडिटी मार्केट तज्ज्ञ आणि आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

दिल्ली – 60,930 रुपये

हैदराबाद – 60,760 रुपये

कोलकत्ता – 60,760 रुपये

लखनऊ – 60,930 रुपये

मुंबई – 60,760 रुपये

पुणे – 60,760 रुपये

नागपूर – 60,760 रुपये

Share This News
error: Content is protected !!