Jodhpur

पावसाळा येतोय… सावधान! तुमच्यासोबतही घडू शकतं ‘असं’… पाहा व्हिडिओ

539 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेक रस्ते अपघाताचे व्हिडिओ पहिले असतील. यातील काही व्हिडिओ खूपच भयंकर असतात. यामध्ये काही लोकांचा जीव देखील जात असतो. नुकताच अशाच एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्कूटीवर बसलेल्या तीन तरुणांच्या बाबतीत अशी एक दुर्घटना घडते याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल.

काय घडले नेमके?
हा व्हायरल होणारा व्हिडिओ राजस्थानमधील जोधपूरचा आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरून एक फांदी अचानक खाली पडताना दिसते. ही फांदी रस्त्यावरुन जात असलेल्या स्कूटीवर तिघांच्या डोक्यावर पडते. त्यामुळे स्कूटीवर बसलेले तिघे तरुण याखाली चिरडले जातात. यानंतर स्थानिक लोक तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन त्या तिघांना बाजूला करतात.

सहसा पोलीस प्रशासन रस्त्यावरून चालताना नियमांचं पालन करण्याच्या कडक सूचना देतात. मात्र स्कूटीवर स्वार असलेल्या तिन्ही तरुणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. हे सगळे त्यांच्या जीवावर बेतले असते. नशीब बलवत्तर म्हणून ते तिघेही यामधून थोडक्यात बचावले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!