Uddhav Nana and sharad pawar

ठाकरे गट आणखी दोन पाऊलं मागं? राऊतांनी सांगितले जागा वाटपाचे नवे सूत्र

615 0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा फॉर्म्यूला समोर ठेवण्यात आला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?
लोकसभेच्या जागा वाटपाबाबत एकच बैठक झाली. जेवढ्या जागा आम्ही जिंकलो होतो तिथे उमेदवार तयार आहेत. तर उर्वरित जागांबाबत चर्चा होणार आहे. तिन्ही पक्षात प्रत्येकी 16 जागांच्या वाटपाचा प्रस्ताव कधी समोर आलाच नाही असे विनायक राऊत म्हणाले आहेत. तसेच एखाद्या जागेवर आमचा उमेदवार कमजोर असेल आणि तीथे महाविकास आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षाचा ताकदवर उमेदवार असेल तर चर्चा करू, तो मोठेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवल्याचे विनायक राऊत म्हणाले आहेत.

भाजपला लगावला टोला
दरम्यान भाजपकडून जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. यावरून देखील विनायक राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपनं कितीही आटापिटा केला तरी मंत्र्यांना प्रचारासाठी गल्लीत जाऊन फिरावं लागत आहे. भाजपने किती अध्यादेश बदलले तरी त्याचा फायदा आता होणार नाही, कर्नाटकात जे झालं तेच राजस्थान आणि महाराष्ट्रात होणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!