Drugs

खेड शिवापुर टोल नाक्यावर 5 कोटींचे ड्रग्स जप्त; 4 जणांना अटक

573 0

खेड – शिवापूर : पुणे पोलिसांनी (Pune Police) नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज (Methamphetamine drugs) जप्त केले आहे. हे अमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जातात. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या ड्रग्स तस्करी प्रकरणी (Drug Trafficking) पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

29 मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) 850 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा अधिक तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहे. आरोपींनी हे अमली पदार्थ कुठून आणले होते तसेच ते कोणाला विकणार होते याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!