Sanjay Shirsat And Sushma Andhare

संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणी पोलिसांकडून ‘क्लीन चीट’

423 0

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विरुद्ध विनयभंग (Molestation) करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर शिरसाट यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगासह परळी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

काय आहे नेमके प्रकरण?
संजय शिरसाट यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळी अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला आणि पोलिसांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांना क्लीन चीट दिली. यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यासह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी संजय शिरसाट यांचे यूट्यूबवर उपलब्ध असलेलं भाषण तपासले. यानंतर या भाषणातील ‘लफडं’ हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का याचीही चौकशी करण्यात आली. तर विनयभंग करण्यात आल्याच्या आरोपाची देखील चौकशी करण्यात आली.

क्लीन चीट प्रकरणी शिरसाट यांची प्रतिक्रिया
पोलिसांकडून क्लीन चीट (Clean cheat) मिळाल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “मी असले कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण एखाद्या गोष्टीचे बाऊ करणे आणि बदनाम करण्याचा हा प्रकार होता. अंधारे कोर्टात देखील गेल्या होत्या आणि त्यांना न्यायालयाने देखील फटकारले आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला टार्गेट करून स्वतः प्रसिद्धीत येण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. मी न्यायालयात गेलो नव्हतो, ते गेले होते. पण न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तसेच जी काही कायदेशीर लढाई लढाईची आहे ती लढणार असल्याचे संजय शिरसाट यावेळी म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!