Mahendrasingh Dhoni

IPLमधून निवृत्तीच्या चर्चेवर धोनीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया (Video)

876 0

अहमदाबाद : काल पार पडलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या सामन्यात चेन्नईने बाजी मारत IPL चे पाचवे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला चेन्नईने 5 विकेट राखून हरवले. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भमिका पार पाडली.

यंदाचा आयपीएलचा (IPL 2023) सिझन सुरु होण्यापूर्वी धोनीच्या आय़पीएलमधून निवृत्तीची (Retirement) चर्चा केली जात होती. धोनीचा हा अखेरचा हंगाम असेल असेदेखील म्हंटले जात होते. प्रत्येक मैदनावर चाहत्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्याचे पाठीराखे मैदानावर उपस्थित होते. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार अशी शक्यता व्यक्त होती. यावर आता स्वतः धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला महेंद्रसिंग धोनी?
धोनी म्हणाला परिस्थिती पाहिली तर माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्यासाठी हे बोलणं सोपं आहे की मी निरोप घेतोय. पण पुढच्या नऊ महिन्यात कठोर मेहनत करून परतणे आणि त्यानंतर एक हंगाम खेळणं कठीण आहे. तसेच तो पुढे म्हणाला शरीराने साथ द्यायला हवी. चेन्नईच्या चाहत्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी मी आणखी एक हंगाम खेळणं हे गिफ्ट असेल. त्यांनी जे प्रेम केलं त्यासाठी मलाही काहीतरी करायला हवं. माझ्या करिअरचा हा शेवटचा टप्पा आहे.

Share This News
error: Content is protected !!