Utter Pradesh Crime

देव तारी त्याला कोण मारी ! गाडीचे चाक अंगावरून जाऊनदेखील चिमुकलीचा वाचला जीव

866 0

मुंबई : आपण सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहत असतो. सध्या एका चिमुकलीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका चिमुकलीच्या अंगावरून कार जाऊनदेखील तिचा जीव वाचला आहे. ही घटना काही चत्कारापेक्षा कमी नाही आहे.

काय घडले नेमके?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याने एक चिमुकली चालत जातान दिसते आहे. ती एकटीच आहे आणि रस्त्याच्या अगदी मधोमध आहे. रस्त्याच्या वळणावर येताच समोरून एक कार येते. ही कार या मुलीला उडवते आणि तिच्या अंगावरून जाते. या अपघातानंतर निर्दयी कारचालक तसाच पुढे निघून जातो. सर्वात संतापजनक म्हणजे त्या चिमुकलीच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही.

https://twitter.com/ReaderTimes2/status/1662781973612605443

हा अपघात (Accident) झाल्यानंतर ती चिमुकली उठून चालत जाताना दिसत आहे. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. तेच या मुलीच्या बाबतीत घडले. एवढ्या मोठ्या अपघातानंतर ती थोडक्यात बचावली आहे. काळ आला होता पण वेळ नाही, याचा प्रत्यय तुम्हाला या व्हिडिओमधून येईल. @ReaderTimes2 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Utter Pradesh) गोरखपूरमधील तिवारीपुरातील आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!