Breaking News
Murder

दिल्ली पुन्हा हादरली! 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; CCTV फुटेज आलं समोर (Video)

862 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहबाद डेअरी (Shahbad Dairy) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 16 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामध्ये आरोपीने तिच्यावर 20 वेळा वार केले आहेत. दिल्लीतील शाहबादमधील जेजे कॉलनीतील तिच्या घराबाहेर तरुणीवर चाकूने वार करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी केले. यामध्ये त्यांनी साहिल आणि मृतक हे नातेसंबंधात होते. पण काल त्यांच्यात भांडण झाले. दिल्लीच्या शाहबाद डेअरी पीएस हद्दीत एका 16 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने वार करून हत्या केली. साहिल असं आरोपीचं नाव आहे. आरोपी साहिलने तरुणीवर वीस वेळा चाकूने वार केले आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीवर पीएस शाहबाद डेअरी येथे 302 आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आरोपी साहिलला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन दिल्ली पोलिस उपायुक्त सुमन नलवा यांनी दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपीची ओळख पटली असून आम्ही लवकरच त्याला अटक करू असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!