Ramdas Aathavle and prakash Ambedkar

रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिली ‘ही’ ऑफर

526 0

अहमदनगर : रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना भाजपसोबत (BJP) येण्याची ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, उद्धव ठाकरेंकडं तुम्हाला काहीही मिळणार नाही. आपण दोघे भाजपसोबत राहू, मी तुम्हाला मोदींकडे घेऊन जातो असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. आता या ऑफरला प्रकाश आंबेडकर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंनाही दिली ऑफर
एवढेच नाहीतर रामदास आठवले यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे, मात्र त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपसोबत येण्याचा विचार करावा. भाजपसोबत आले तर तुमचं स्वागत करू. असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.

शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा
यादरम्यान रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी पुन्हा शिर्डीत येणार आहे. 2009 मध्ये मी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. संधी मिळाली तर मी पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवेल. कारण माझा शिर्डीच्या जनतेवर विश्वास आहे. इथली जनता मला स्वीकारेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!