Buldhana Car Accsident

बुलढाण्याजवळ रेलिंगला धडकून कारचा भीषण अपघात; 2 जण ठार

880 0

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघात काही थांबताना दिसत नाही आहेत. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ (Buldhana) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुलढाण्याजवळच्या देऊळगाव कोळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. इम्पॅक्ट बॅरियरला कार धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
बुलढाण्या जवळच्या देऊळगाव कोळ गावानजीक चेनेज 305 जवळ मुंबई कॉरिडरवर हा भीषण अपघात झाला. यामध्ये ही भरधाव कार अनियंत्रित होऊन इम्पॅक्ट रेलिंगवर जाऊन आदळली. त्यानंतर या गाडीला भीषण आग लागली. यावेळी या गाडीमध्ये तीन प्रवासी होते. त्यातील दोन प्रवाशांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. या जखमी व्यक्तीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यामध्ये दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. एक जण गंभीर जखमी झाला होता. आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मृतांची ओळख मात्र अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!