Pune Accsident

पुण्यात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बसचा भीषण अपघात

792 0

पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक अपघाताची (Accident) घटना पुण्यात घडली आहे. यामध्ये ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये एकूण 25 प्रवासी होते ते थोडक्यात बचावले आहेत.

काय घडले नेमके?
आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये ही घटना घडली आहे. या बसचा अचानक ब्रेक फेल (brake failure) झाल्याने ही शिवशाही बस थेट फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!