Pimpari Accsident

PMPL बसची टेम्पोला धडक, दोन जण जखमी

3775 0

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) एक भीषण अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील डांगे चौक (Dange Chowk) ते औंध बीआरटी (Aundh BRT) मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये PMPL बसने तीन चाकी टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला आहे.

काय घडले नेमके?
वाकड येथील डांगे चौक ते औंध बीआरटी मार्गावरून PMPL बस पहाटेच्या सुमारास जात होती. या दरम्यान तीन चाकी टेम्पोने अचानक बीआरटी मार्गावर यु-टर्न घेतला. यामुळे भरधाव बसने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, टेम्पो पलटी झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!