Fight

नाश्त्याच्या पैशावरून तीन महिलांची तरुणीला भर चौकात मारहाण (Video)

1073 0

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये आपण भररस्त्यात, दुकानात, मॉलमध्ये, रेल्वे स्थानकावर, बसमध्ये, अशा निरनिराळ्या ठिकाणी भांडणे होताना आपण पाहत असतो. कधी कधी एका शुल्लक कारणावरून वाद होतो आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये होते. सध्या असाच महिलांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हा व्हिडीओ रायपूर येथील भातागावचा आहे. यामध्ये बसस्थानकावर डोसा खाल्ल्यानंतर अल्पवयीन मुलीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दुकान चालवणारी महिला आणि तरुणी यांच्यात बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, तीन महिला एका तरुणीला मारहाण करताना दिसत आहेत.

यानंतर स्थानिक लोक आणि एक पोलीस मध्यस्थी करून मुलीची सुटका करताना दिसत आहेत. महिला आणि तरुणींमधला हा हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!