Eknath Shinde

बनावट ‘CMO अधिकाऱ्या’चा शिक्षण संस्थांना गंडा; मुख्यमंत्र्यांच्या नावाने द्यायचा प्रवेश

511 0

पुणे : काही दिवसांपूर्वी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांच्या नावाने आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी (OSD to CMO) असल्याचे सांगून एकाने पुण्यातील महत्त्वाच्या पाचहून अधिक शैक्षणिक संस्थांना गंडा घातला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नामवंत महाविद्यालयात प्रवेश देतो असे सांगत त्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर सीएमओच्या नावाने अ‍ॅडमिशन करण्यास सांगून दबाव आणला जात होता. यानंतर या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिसमध्ये या बनावट CMO अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.

सीएमओसह आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावानेही पुण्यातील शिक्षण संस्थांना फोन केल्याचे उघडकीस आले असून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय चौबे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले आहे. राहुल पलांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस, डीवाय पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, तानाजी सावंत यांचे जयवंत प्रसारक शिक्षण मंडळ याशिवाय पुण्यातील नामवंत महाविद्यालांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांना लाखों रुपयांचा गंडा घातला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रवेश मिळवून देणाऱ्या व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील नितीन यू. पानसरे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल राजेंद्र पलांडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!