Baramati Died

ट्रॅक्टर अंगावर उलटून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

1018 0

बारामती : पुण्यातील बारामतीमध्ये (Baramati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील बोरकरवाडी या ठिकाणी घडली आहे. आकाश सुभाष बोरकर (वय 25 वर्ष) (Akash Subhash Borkar) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि. 24) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आकाश हा बोरकरवडी गावच्या हद्दीत जमिन गट क्रमांक 289 मध्ये च्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच 42, बीजे – 0697) चालवत बांधावरुन नेत होता. यादरम्यान अचानक त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला. यातच आकाशचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोरकर हे त्यांच्या शेतात आज सकाळी उसाची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. हा छोटा ट्रॅक्टर घेऊन उसाची बांधणी करत असताना अचानक बांधाच्या बाजूला एकेरी चाक होऊन ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नसल्यामुळे आकाशचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतात मजुरीसाठी असलेल्या महिलांनी हा प्रकार पाहिला त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आकाशचा मोठा भाऊ अक्षय बोरकर यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली. पोलिस रुपेश साळुंखे (Police Rupesh Salunkhe) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!