शॉपिंग करताना मोबाईल नंबर देण्याची सक्ती नाही, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचा मोठा खुलासा

1290 0

मॉलमध्ये जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला बिलिंग काऊंटरवर बिल Shopping देण्यापूर्वी तुमचा मोबाईल नंबर नक्कीच विचारला जातो. गरज नसताना आपणही सहजपणे नंबर देऊन टाकतो. मात्र, आता बिल घेण्यासाठी कुठल्याही दुकानदाराला मोबाईल नंबर देण्याची गरज भासणार नाही. याबाबत केंद्र सरकारनं महत्त्वाचा खुलासा केला आहे.

अनेकदा शॉपिंग केल्यावर दुकानदार आपला मोबाईल नंबर मागतात. सामानांच बिल मोबाईलवर येईल, नाहीतर बिल देऊ शकत नाही, असं कारण ते सांगतात. ग्राहकाने मोबाईल क्रमांक दिल्यानंतर फोनवर खरेदी, विक्री संबंधित अनावश्यक कॉल्स आणि मेसेज येऊ लागतात. केंद्रीय ग्राहक खात्यानं याविषयी माहिती देताना म्हटले की, मॉल, शोरूम, किरकोळ विक्री करणारे दुकानदार आता ग्राहकांना बिल भरण्याअगोदर मोबाईल क्रमांक देण्यासाठी सक्ती करू शकत नाही.

मोबाईल नंबर देण्याची सक्ती ग्राहकांवर केली जाऊ शकत नाही, तसं केल्यास ते ग्राहक हक्क नियमावलीचा भंग समजलं जाईल, आणि संबंधित दुकानदार किंवा आस्थापनावर कारवाईही केली जाऊ शकते, जर एखादा दुकानदार ग्राहकावर सक्ती करत असेल तर ग्राहक त्या विरोधात लेखी किंवा ऑनलाईन तक्रार करु शकतात. असं केंद्रीय ग्राहक खात्यानं स्पष्ट केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!