‘साराभाई वर्सेस साराभाई 2’ (Sarabhai vs Sarabhai) या शोमध्ये जॅस्मीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyaya)
हिचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. वैभवी उपाध्याय ३२ वर्षांची होती. वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’ मध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेते जेडी मजेठिया यांनी तिच्या मृत्यूची माहिती दिली केली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली. या अपघातातून तिचा होणार पती बचावला आहे. चंदिगडमध्ये असलेले तिचे कुटुंबीय तिचा मृतदेह मुंबईत आणणार आहेत. आज बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वैभवीने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर हिमाचल प्रदेशातील डोंगरदऱ्या, मंदिर, रस्ते यांचा सुंर नजारा दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. ही तिची शेवटची पोस्ट ठरली. हा व्हिडिओ २०१९ चा असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. ४ वर्ष जुन्या आठवणी तिने शेअर केल्या होत्या.