Nagpur

नागपूरमध्ये कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात

5578 0

नागपूर : नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि चुलत भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. कन्हान परिसरात रविवारी मध्य रात्री ही घटना घडली आहे.

या अपघातात परवेझ खुर्शीद अन्सारी 36 वर्ष आणि आफिफा परवेझ अन्सारी (12) यांचा जागीच मृत्यू झाला तर अमराह परवेझ अन्सारी (33) आणि चालक नदीम नाइस अन्सारी (28) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. चारही शारा, तालुका दामपूर जिल्हा बिजनौर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत.

घटनेच्या दिवशी हे चौघे रविवारी सकाळी सातच्या सुमारास नवी दिल्लीहून बंगळुरूला निघाले होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी नागपूर शहरात राहण्याचा बेत आखला. मात्र, नागपूर शहरात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारचा अपघात झाला. कन्हान परिसरात येताच नदीमचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पराग फुलझेले करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!