War 2

ऋतिक रोशन अन् ज्युनियर एनटीआरचा ‘वॉर 2’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

558 0

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (JR NTR) सध्या ‘वॉर 2’ (War 2) या सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही आहे. मात्र ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

‘वॉर 2’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा आगामी ‘वॉर 2’ हा बहुचर्चित सिनेमा 25 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि ऋतिक रोशन एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) स्पाय सुनिव्हर्समधील हा आगामी सिनेमा असणार आहे.

अयान मुखर्जी यांनी ‘वॉर 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संभाळली आहे. या सिनेमानंतर ते ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र 3’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत निर्मिती होत असलेला सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानंतर ‘वॉर 2’ (War 2) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share This News
error: Content is protected !!