सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीनिवास पांचाळ यांच्यातर्फे अनाथ मुलांना अन्नदान

481 0

पुणे- स्माईल प्लॅनेट डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. श्रीनिवास पांचाळ यांनी नुकतीच काळेपडळ येथील शंभूजी राजे प्रतिष्ठान अनाथाश्रम, वृद्धाश्रम गोशाळा येथे भेट दिली. या ठिकाणी असलेल्या अनाथ मुलांसाठी अन्नदान केले.

डॉ. श्रीनिवास पांचाळ यांनी येथील अनाथ मुलांच्या सोबत बसून त्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्याशी संवाद साधला. आनंदी राहण्यासाठी तुमच्या मूलभूत गरजा भागवता येणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आणि गरजूंना मदत करण्याची तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे अशी भावना डॉ. श्रीनिवास पांचाळ यांनी व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!