Buldhana Accsident

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; 8 जण ठार

700 0

बुलढाणा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. मुंबई – नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा असाच एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. बुलढाण्यातील (Buldhana) सिंदखेडराजा जवळ हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. एसटी बस आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींवर सध्या सिंदखेडराजा रुग्णालयात (Sindkhedaraja Hospital) उपचार सुरु आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या (Washim) दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!