Sameer Wankhede

माझ्यावरही अतिक अहमदसारखा हल्ला होऊ शकतो; वानखेडेंची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

862 0

मुंबई : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Former Director of NCB Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कार्डेलिया क्रूझ प्रकरणावरून (The Case of Cardelia Cruz) वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai Highcourt) रिट पिटीशन दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने 24 मे पर्यंत वानखेडेंना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच 22 मे पर्यंत त्यांना सीबीआयकडे आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. त्यामुळे आता वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे वानखेडे यांना त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. गँगस्टर आतिक अहमदसारखी (Gangster Atiq Ahmed) माझी परिस्थिती होईल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. अशीच घटना आपल्याबाबत घडण्याची भीती वानखेडे यांनी व्यक्त केली आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना धमकी देण्यात आली होती. “तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा. तुमको खत्म कर देंगे”, असा धमकीचा मेसेज त्यांना आला होता.

Share This News
error: Content is protected !!