चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चंद्रपुरातील नागभीड – तडोधी या मार्गावर (Nagbhid – Tadhodi Marg) एका भीषण अपघातात (accident) माया – लेकरांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्पना रमाकांत कड्यालवार (Kalpana Ramakant Kadialvar) मृत आईचे तर आणि साहिल रमाकांत कड्यालवार (Sahil Ramakant Kadialwar) असे मुलाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सिंदेवाही येथील रमाकांत कड्यालवार आपल्या कुटुंबासोबत नागपूरला गेले होते. त्यांनी नागपुरात बुलेट गाडी विकत घेतली आणि ते भिवापूर मार्गे सिंदेवाहीला परत निघाले. बुलेटने आई कल्पना आणि मुलगा साहिल निघाला. तर कारने वडील रमाकांत आणि मोठा मुलगा समीर निघाला होता. नागपूर येथून निघाल्यावर बुलेट दोनदा बंद पडली. त्यानंतर नागभीड – तळोधी मार्गांवरील बोकडडोह पुलावर तिसऱ्यांदा बुलेट बंद पडली.
यानंतर आई आणि मुलगा बुलेटला काय झालं हे चेक करण्यासाठी खाली उतरले होते. यादरम्यान भरधाव येणाऱ्या टिप्परने मागून बुलेट आणि कारला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगा आणि आई पुलाखाली फेकले गेले आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये असलेले रमाकांत कड्यालवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यानंतर मोठा मुलगा समीर याने पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी नागभीडला (Naagbhid) हलविले. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.