Chappal

चप्पल चोरली म्हणून पट्ठ्याने चक्क 3 जणांविरोधात दाखल केली तक्रार

629 0

पुणे : पुण्यामधून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा (theft) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.सागर दत्ता चांदणे, आकाश विक्रम कपूर आणि अरबाज जाफर शेख असे गुन्हा दाखल दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील खडकी भागात असलेल्या मुस्लिम बँकेच्या समोर फिर्यादी हरेश अहुजा यांचं चपलेचं दुकानं आहे. अहुजा हे रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर आरोपींनी रात्रीच्या सुमारास त्यांचे हे चप्पलचे दुकान फोडले. या आरोपींनी दुकानातून तीस बुटांचे तर पंधरा चपलेचे जोड चोरले. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आपल्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!