Job

ICMR मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

649 0

मुंबई : जे तरुण नोकरीच्या (Job) शोधात आहेत तर ही बातमी त्यांच्यासाठी आहे. ICMR म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती (recruitment) काढण्यात आली आहे. ही भरती आयसीएमआरच्या वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य केंद्रात होणार आहे. ही भरती टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) आणि फिल्ड वर्कर (Field worker) या पदांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे या जागांची भरती थेट मुलाखतीच्या (interview) माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. चला तर या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया…..

‘या’ पदांसाठी होणार भरती
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य केंद्रात टेक्निकल असिस्टंट आणि फिल्ड वर्कर या दोन पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?
टेक्निकल असिस्टंट पदाची एक रिक्त जागा आणि फिल्ड वर्कर या पदाची एक रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार असल्याचे आयसीएमआरच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, टेक्निकल असिस्टंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार सायन्स फॅकल्टी मधील पदवीधर आणि संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव किंवा पदव्यूत्तर पदवीधर यासाठी पात्र राहणार आहेत. संबंधित क्षेत्रातील अनुभवासह पर्यावरण विज्ञान/ रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार.

याशिवाय फिल्ड वर्कर या पदासाठी 12 वी उत्तीर्ण आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा दोन वर्षांचा डिप्लोमा केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. किंवा एका वर्षाचा डीएमएलटीचा कोर्स पूर्ण केलेले उमेदवार, सोबतच एक वर्ष कामाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात. तसेच बीएससी पदवी आणि संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.

वयोमर्यादा
या पदासाठी तीस वर्षापेक्षा अधिक वयाचे उमेदवार पात्र राहणार नाहीत.

पगार किती मिळणार?
फिल्ड वर्कर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रुपये + एचआरए 4860 रुपये असे वेतन दिले जाणार आहे. याशिवाय टेक्निकल असिस्टंट या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 20,000 रुपये + एचआरए 5400 रुपये प्रति महिना वेतन देण्यात येणार आहे.

कधी होणार मुलाखत?
थेट मुलाखतीच्या माध्यमातून या पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठीची मुलाखत 2 जून 2023 रोजी आयसीएमआर सीएएम कोलकता येथे आयोजित करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide