royal-challengers-bangalore-players

IPL 2023 : RCB संघाला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

496 0

बंगळुरू : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाला आज गुजरात टायटन्स (GT) विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. आजचा सामना आरसीबीसाठी ‘करो या मरो’चा असताना संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

आरसीबीचा ‘हा’ गोलंदाज जखमी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. हेजलवूडच्या पायाच्या घोट्याला लागल्याने दुखापत झाली आहे. आरसीबीचे संचालक माईक हेसन यांनी याची माहिती दिली आहे.

जोश हेजलवुड आयपीएलमधून बाहेर
जोश हेजलवुड याचे प्लेऑफपूर्वी बाहेर पडणं आरसीबीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुखापतीमुळे जोश हेजलवुड आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तो उपचारासाठी मायदेशी परतणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!