Sanjay Raut

‘गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; राऊतांनी व्यक्त केली खंत

902 0

बीड : नुकतीच बीडमध्ये (Beed) महाप्रबोधन यात्रेची (Mahaprabhodhan Yatra) सांगता झाली. या यात्रेदरम्यान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोपीनाथ मुंडेबाबत (Gopinath Munde) एक खंत व्यक्त केली आहे. ‘शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. त्यांच्या नंतर सगळीच नाती तुटली. ते असते तर कदाचित युती आणि नाती तुटली नसती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तसेच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा टिकवला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असेदेखील संजय राऊत म्हणाले. तसेच ”जो आम्ही पाहिला तो भारतीय जनता पक्ष राहिला नाही. महाराष्ट्रातला आणि देशातला अटलजी आणि आडवाणी यांचा केंद्रातला आणि महाराष्ट्रातला गोपीनाथ मुंडे यांचा भाजप (BJP) राहिला नाही.”

‘पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे’
गोपीनाथ मुंडे यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे राजकारणात वावरायाचे त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी अनेक कार्यकर्ते नवीन निर्माण केले.” असेदेखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!