Akola Crime

अकोला दंगलप्रकरणी आरोपी अरबाज खानला अखेर अटक

719 0

अकोला : अकोला दंगल प्रकरणात (Akola Riot Case) प्रमुख आरोपी असणाऱ्या अरबाज खानला (Arbaz Khan) अखेर अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर अरबाज खानने वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच अरबाजने बेकायदा जमाव जमवल्याचा आरोपदेखील त्याच्यावर करण्यात आला आहे. ज्या पोस्टमुळे अकोल्यात दंगल उसळली होती ती पोस्ट (Viral Post) अरबाज खानने सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

अकोला दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या अनुषंगाने अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अकोला दंगलीत प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असलेल्या अरबाज खानला अकोला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अरबाज मुख्य तक्रारदार होता. तक्रार दिल्यानंतर तो फरार झाला होता. अरबाजनेच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटिंग एका विशिष्ट समाजाच्या गृपवर व्हायरल केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. ज्या कथित इंस्टाग्राम अकाउंटवरून वादग्रस्त चॅटिंग झालं, त्या वादग्रस्त अकाउंट मालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दंगलीच्या तब्बल सहाव्या दिवशी अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कोण आहे अरबाज खान?
या प्रकरणात इंस्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणारा प्रकरणातील मुख्य तक्रारदार.
– अरबाज हा सध्या मुंबईत व्हीएफएक्स अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी.
– अरबाज अकोल्यातील मोहता मिल भागातला रहिवाशी.
– अरबाजवर रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताना बेकायदा जमाव जमविल्याचा आरोप.
– अरबाजनेच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटिंग व्हायरल केल्याचा आरोप.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!