Rape

पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

571 0

पुणे : बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणार्‍या महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचे (Maharashtra Police Mega City) संचालक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे (Retired ACP Suresh Bhamre) यांच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेच्या जागेत गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी येरवडा येथील एका 44 वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station)आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. संचालक मंडळावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. फिर्यादी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या बांधकामाचे शुटिंग करीत होत्या. तेव्हा भामरे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. फिर्यादीचा हात पकडून फिर्यादी यांच्या गालाला स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी (PI Sangeeta Mali) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!