The Kerala Story

FTII मध्ये केरला स्टोरीच्या शोपूर्वी विद्यार्थ्यांचे आंदोलन

724 0

पुणे : पुण्यातील (Pune) FTII मध्ये शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘द केरला स्टोरी’ (‘The Kerala Story’) या चित्रपटाच्या विशेष शोच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन (movement) करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी काही जणांनी लव्ह जिहादच्या (Love Jihad) मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्विग्न होऊन, निदर्शने करीत घोषणाबाजी करणाऱ्यांना कॅम्पसच्या बाहेर काढण्याची मागणी केली. अभिनेते योगेश सोमण यांच्यावर घोषणाबाजी केल्याचा आरोप करत त्यांना तातडीने कॅम्पस बाहेर काढण्याची मागणी केली आहे. मिती फिल्म सोसायटीने (Miti Film Society) विशेष शोचे आयोजन केले होते.

FTII च्या विद्यार्थी समुदायाला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली नव्हती. हा विरोध टाळण्यासाठी ही बातमी आदल्या दिवशीच संध्याकाळी बाहेर आली. यानंतर हा चित्रपट ज्या नीच प्रचाराचा उद्देश आहे त्याचा निषेध करणे हे आपल्या विद्यार्थी समाजाचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांकडून मांडण्यात आली आहे.

या चित्रपटाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांनी अलीकडच्या काळात चित्रपटाची प्रशंसा केली आहे, काही राज्यांनी तो आपल्या राज्यात करमुक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!